जान्हवीची आई श्रीदेवीसाठी भावनिक पोस्ट

दिवंगत श्रीदेवी यांचे निधन होऊन एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. श्रीदेवी यांच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टीसह सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर श्रीदेवींसोबतचे फोटो शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा देत असते. ‘मातृदिनी’ जान्हवीने तिच्या आईसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला तिने भावनिक कॅप्शनही लिहिलं आहे.