तापसी पन्नूला तब्बल ३६ हजारांचं वीज बिल

वाढीव वीज बिलाचा फटका फक्त सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रेटींनाही बसत असल्याचं समोर आलं आहे. तापसू पन्नूला तब्बल ३६ हजारांची वीज बिल आलं आहे. तापसीने ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. तापसीने आपल्या ट्विटमध्ये आधीच्या महिन्यांच्या वीज बिलाचे फोटोही जोडले आहेत.

तापसी पन्नूने ट्विट करत म्हटलं आहे की, “लॉकडाउनचे तीन महिने आणि कोणती नवी उपकरणं मी वापरली आहेत किंवा नव्याने विकत आणली आहेत ज्यामुळे मला इतकं वीजबिल आलं आहे. नेमकं कोणत्या वीजेचं शुल्क आकारत आहात?,” अशी संतप्त विचारणा तापसीने ट्विटच्या माध्यमातून केली आहे. यावेळी तापसीने अदानी वीज कंपनीला टॅगही केलं आहे.

 

You might also like