एकता कपूर झाली आई; दिला मुलाला जन्म

बालाजी टेलिफिल्म्सची सर्वेसर्वा एकता कपूर ही आई झाली आहे. एकता कपूरने सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला असून लवकरच चिमुकल्याचे एकताच्या घरी आगमन होणार आहे.
एकता कपूर लग्न न करताच आई झाली आहे. २७ जानेवारी रोजी सरोगसीद्वारे एकता कपूर आई झाली आहे. बाळ सुखरुप असून लवकरच कपूर कुटुंबाच्या घरी बाळाचे आगमन होईल, असे सूत्रांनी सांगितले. या वृत्तासंदर्भात एकता कपूर किंवा कपूर कुटुंबातील सदस्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.
यापूर्वी तुषार कपूर, करण जोहर या मंडळींनीही सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला होता. तर आमिर खान- किरण राव, शाहरुख खान – गौरी यांनी देखील सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला होता.
महत्वाच्या बातम्या –