‘टीकटॉक’ प्रकरणी एजाज खानला अटक

एजाज खानला गुरुवारी अटक करण्यात आली. पोलिसांविरोधात टीकटॉक व्हिडिओ करत त्यात पोलिसांविरोधातच आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी टीकटॉकच्या ‘०७ ग्रुप’ने तरबेज अन्सारी मॉब लिचिंगप्रकरणी वादग्रस्त व्हिडिओ बनवला होता.

या व्हिडिओमधील आरोपींचं एजाजनं समर्थन केलं होतं. इतकंच नाही तर त्याने, सायबर सेलप्रकरणी गुन्हा दाखल असणाऱ्या फैजू या व्यक्तीचंही समर्थनही केलं होतं. त्यानंतर त्याच्यासोबत व्हिडिओ बनवत एजाजने मुंबई पोलिसांची खिल्ली उडवली.

 

You might also like