‘आता कोणी पोलिसांच्या मृत्यूवर RIP म्हणणार नाही’

उत्तर प्रदेशात चकमकीदरम्यान आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. विकास दुबे नावाच्या एका गुंडावर ६० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांचं एक पथक विकास दुबेचा शोध घेत होते. पोलीस बिकरु गावात विकास दुबेच्या शोधात गेली असता गुंडांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. इमारतीवरुन पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरु झाला. या हल्ल्यात पोलीस उपाधिक्षकाचाही समावेश आहे. कानपूर येथे पोलीस विकास दुबे नाकम गुंडाला अटक करण्यासाठी गेली असता ही चकमक उडाली.

या दुदैवी प्रकरणावर कपिल शर्मा याने संताप व्यक्त केला आहे.“आज मी रेस्ट इन पीस बोलणार नाही. कारण जोपर्यंत आरोपी पकडले जात नाही तोपर्यंत शहिद झालेल्या त्या पोलिसांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. युपी पोलीस लवकरात लवकर त्या गुन्हेगारांना पकडतील.” अशा आशयाचे ट्विट करुन कपिल शर्मा याने शहिद पोलिसांना श्रद्धांजली वाहिली आहे. कपिलचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

You might also like