आलियाच्या ‘या’ गोष्टी मुळे रणबीर वैतागला?

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या चांगलेच चर्चेत आहेत. दोघेही ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. दोघांचं अफेअर असल्याचं जवळपास कंफर्म आहे. पण या दोघांच्या रिलेशनशीपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं बोललं जातंय.

एका  वृत्तांनुसार, आलिया आणि रणबीर यांच्या रिलेशनशीपमध्ये सगळं काही ऑल इज वेल नाही. आलियाच्या वारंवार फोन, मेसेज करण्याने रणबीर वैतागला असल्याचं बोललं जातंय.आलिया रिलेशनशीप पुढे वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय, जे रणबीरला पटलेलं नाही. आलिया आणि रणबीर यांच्या साखरपुड्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. शिवाय आलियाचं कपूर कुटुंबीयांमध्ये मिसळलेलंही पाहायला मिळालं होतं.

आलिया आणि रणबीर या रिलेशनशीपबाबत सीरियस असल्याचं सांगितलं जातं. नीतू कपूर यांनी मुलगा रणबीरला साखरपुड्यासाठी तयार केल्याचं बोललं जात होतं. पण आलिया आणि रणबीर सध्या लग्नाच्या मूडमध्ये नाहीत.

महत्वाच्या बातम्या –

You might also like