‘उरी’ चित्रपट डाऊनलोड करताय ? मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा !!

पायरसीची किड चित्रपटसृष्टीला पोरखून काढत आहे. पायरसीच्या कचाट्यात बॉलिवूडमधले अनेक चित्रपट सापडले. मात्र पायसरीवर तोडगा शोधण्यासाठी ‘उरी – द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक भन्नाट आयडीया शोधून काढली आहे. सध्या याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

उरी सिनेमा दणक्यात कमाई करत असतानाच काही जणांना टोरण्ट वेबसाईट्सवरून या सिनेमाची पायरेटेड कॉपी डाऊनलोड करुन पाहण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्यपणे कोणीतरी सिनेमागृहामध्ये चोरून शुटिंग करुन वगैरे सिनेमे टोरण्टसारख्या साइटवर लिक करतात. मात्र इथे सिनेमाच्या टीमनेच टोरण्टवर सिनेमा अपलोड केला आहे.

अनेकांना हे व्हिडीओ पायरसी करणाऱ्या साईटवर उपलब्ध करुन दिले जात आहेत. ३.८ जिबीची फाइल डाऊनलोड केल्यानंतर सिनेमा पाहण्यासाठी जेव्हा व्हिडीओ प्ले केल्यास त्यामधून सिनेमा बेकायदेशीरपणे टोरण्टच्या माध्यमातून पाहणाऱ्यावरच सर्जिकल स्ट्राइक होते.

https://youtu.be/LZunXGGflA4

महत्वाच्या बातम्या –

You might also like