‘कोरोना रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना वेगळे टाकू नका’

कोरोना विषाणूने साऱ्या जगात धुमाकुळ घातल्यानंतर चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या घरातही शिरकाव केला. गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या कुटुंबियांना देखील कोरोनाची लागण झाली होती. स्वतः अनुपम खेर यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली.

दरम्यान, कोरोना रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका अहोरात्र घेत असलेल्या प्रयत्नांची दखल अनुपम खेर यांनी घेतली आहे. नुकतंच त्यांनी ट्विट करून आपली आई कोरोनामुक्त झाल्याची माहिती दिली.

अनुपम खेर म्हणाले कि, ‘कोरोना रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वेगळे टाकू नका. त्यांनाही भावनिक गरज असते, असे सांगत डॉक्टर्स आणि पालिकेचे कर्मचारी, अधिकारी, आरोग्य अधिकारी हेच मुंबईचे खरे हिरो आहे’. असे अनुपम यांनी म्हंटल. तसेच त्यांनी मुंबई पालिकेचे खास तोंड भरून कौतुक सुद्धा केले.

 

You might also like