डॉन आणि डीनची लव्हस्टोरी पुन्हा छोट्या पडद्यावर येण्यास सज्ज

‘डॉक्टर डॉन’ मालिकेतील श्वेता शिंदे आणि देवदत्त नागे यांची लव्ह केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. डार्लिंग डीनच्या प्रेमात फक्त देवाच नाही तर चाहतेसुध्दा पडले आहेत. लॉकडाऊनमधून अनलॉकमध्ये आल्यानंतर मालिकांच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. त्यामुळे डॉन आणि डीनची ही लव्हस्टोरी आता पुन्हा छोट्या पडद्यावर येण्यास सज्ज झाली आहे.

श्वेता यांनी नुकताच सेटवरील फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांना मेक अप करत असलेली व्यक्ती पीपीई किट घालून मेक अप करताना दिसते आहे. सेटवरही जोरदार तयारी दिसून येत आहे. त्यामुळे आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजन होईल यात शंका नाही.

You might also like