“डॉली किट्टी और वो चमकते सितारे” लवकरच होणार प्रदर्शित

भूमी पेडणेकर आणि कोंकणा सेनशर्मा अभिनीत “डॉली किट्टी और वो चमकते सितारे” हा चित्रपट 18 सप्टेंबर रोजी रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटात स्वातंत्र्याचा शोध घेणाऱ्या दोन बहिणींची कथा सांगण्यात आली आहे. कोंकणा ही डॉली, तर भूमी ही किट्टीची भूमिका साकारत आहे.
या प्रवासात ती स्वत:ला एक नवीन माणूस म्हणून पाहते. तिच्या या प्रवासात प्रत्यक्षात कोणत्या प्रकारच्या गोष्टी येतात हे पाहणे योग्य ठरेल, असे तिने सांगितले. दरम्यान, अलंकृता श्रीवास्तव द्वारा लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
आपल्या भूमिकेबाबत कोंकणा म्हणाली, डॉलीचे आयुष्य हे सर्वसाधारण महिलांप्रमाणेच सर्वांनी पाहिलेले असे आहे. जी एक आरामदायक जीवन जगू इच्छित असते. पण तिच्या बंडखोर स्वभावामुळे तिला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. दुसरीकडे भूमी आपल्या पात्राबाबत सांगते की, किट्टी एक स्वप्नांनी भरलेली एक स्वप्नाळू मुलगी आहे. जिच्या आयुष्याचा प्रवास तिच्या बहिणीपासून सुरू होतो.