ईशा-विक्रांतच्या लग्नपत्रिकेची किंमत तुम्हाला माहिती आहे का ?

‘तुला पहाते रे’ मालिकेतील विक्रांत आणि ईशाचं लग्न अखेर ठरलं. लग्नातली महत्त्वाची गोष्ट असते लग्नपत्रिका.सरंजामेंची लग्नपत्रिका खासच आहे. ती दाखवायचं काम त्यांनी सोपवल आहे मायरावर. मायरा ऑफिसमध्ये सगळ्यांना काॅन्फरन्स हाॅलमध्ये बोलवून ती पत्रिका दाखवते .

लग्नपत्रिका सगळ्यांना दाखवायचा कार्यक्रम एकदम शानदार झाला.यावेळी ईशाची आई , वडील आणि मावशीही आल्या होत्या. वैभवाचं दर्शन झाल्यावर हरखून गेल्या होत्या.या पत्रिकेची किंमत काय, हा प्रश्न ईशाच्या वडिलांनी मायराला विचारला.त्याचं उत्तर ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. ते म्हणजे याची किंमत आहे दीड लाख रुपये.विक्रांत आणि ईशाचं लग्न भोरला 13 जानेवारीला होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –