मेकअप करतोय का दिवाळीचा फटाका लावतोय काय माहीत……

नियमांचं पालन करत मनोरंजन विश्वातील चित्रीकरणाला आता सुरुवात झाली आहे. येत्या 13 जुलैपासून टेलिव्हीजनवर नव्या भागांची पर्वणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’ विनोदी कार्यक्रमाचे जुने भाग मागील तीन ते चार महिने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

मात्र नुकतीच या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. कलाकारही सेटवर पुन्हा येऊन आनंदी झाले आहेत. अभिनेता कुशल बद्रिकेने याचविषयी एक गमतीशीर पोस्ट सोशल मिडीयावर केली आहे.

सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करताना एकमेकांपासून अंतर ठेवून ही सगळी कामं केली जात आहे. तेव्हा मेकअप आर्टीस्टही तशाच पद्धतिने सोशल डिस्टंसिंग पाळून आणि सुरक्षिततेची काळजी घेत आहे. आणि पीपीई किट घालून मेकअप करत आहेत.या कॅप्शनमध्ये कुशल लिहीतो की, “आज ४ महीन्याने हा माझ्या चेहऱ्याला मेकअप करतोय, मेकअप करतोय का दिवाळीचा फटाका लावतोय काय माहीत.”

 

You might also like