‘बदला’ चित्रपट पाहताना एक क्षणही चुकवू नका – तापसी पन्नू

तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘बदला’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सुजॉय घोष यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. बऱ्याच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये क्राइम- थ्रिलर पाहायला मिळणार आहे.
‘आतापर्यंत तुम्ही पाहिलेल्या चित्रपटापेक्षा हा चित्रपट खूपच वेगळा आहे. हा क्राइम- थ्रिलर आहे त्यामुळे चित्रपट नीट लक्ष देऊ पाहा. एक मिनिटंही चुकवलं तरी तुम्हाला चित्रपटाची कथा काहीच कळणार नाही.’ असा सल्ला तापसीनं दिला आहे.
एका खूनाच्या आरोपात तापसी अडकते. यातून ती बाहेर कशी येते वकील तापसीला यातून बाहेर कसे काढतात, ही मर्डर मिस्ट्री कशी उलगडते हे ‘बदला’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ‘मिलन टॉकीज’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित….
- ‘बदला’ चित्रपटाचे पहिले गाणे ‘क्यू रब्बा’ प्रदर्शित
- ‘सूर सपाटा’ चित्रपटाचं पहिलं गाणं ‘रंग भारी रे’ प्रदर्शित
- अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित