कार्तिकला मेसेज करू नकोस, साराला आईकडून महत्त्वाचा सल्ला

सारा अली खानने कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये तिला अभिनेता कार्तिक आर्यन आवडत असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता तिने कार्तिकला मेसेज न करण्याचे ठरवले आहे. कारण तिची आई अमृता सिंगने तिला मेसेज न करण्याचा सल्ला दिली आहे.
रणवीर सिंगने या दोघांचि सिंबाच्या प्रिमियर शो ला ओळखही करून दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून साराच्या चित्रपटांसोबतच तिच्या कार्तिक कनेक्शनचीही जोरदार चर्चा रंगली आहे.
साराच याच संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. इन्स्टाग्रामवर कार्तिकला तू मेसेज केला नाहीस का, अशा आशयाचा प्रश्न विचारताच साराने त्याचं उत्तर देत सर्वांचं लक्ष वेधलं.
‘मी कार्तिकला मेसेज करण्यासाठी इतकी देखील उतावळी झालेली नाही आणि आईने मला मेसेज करू नको. त्याची वाट बघ असे सांगतिले आहे. त्यामुळे मी आता त्याची वाट बघतेय’ असे साराने यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
- मला मलायका आवडते! ‘त्याची’ जाहीर कबुली
- ‘हम चार’ चित्रपटाचे नवे गाणे ‘फ्रेंड्स भी फॅमिली है’ प्रदर्शित
- शिवानी बावकर-पूर्णिमा डे लवकरच दिसणार एका चित्रपटात
- ‘हम चार’ चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित…..