मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका, माझी स्वत:ची एक ओळख आहे

मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका, माझी स्वत:ची एक ओळख आहे, अशी खंत अभिनेता निहार पांड्याने व्यक्त केली. दीपिकाचं लग्न झालं आहे आणि मीसुद्धा लवकरच लग्न करत आहे. त्यामुळे आता कोणी माझ्या नावासोबत दीपिकाचं नाव जोडू नका, अशी विनंती त्याने एका मुलाखतीदरम्यान केली.

निहार येत्या १५ फेब्रुवारीला निती मोहनशी विवाहबंधनात अडकणार आहे. दोघांचं ब्रेकअप झाल्यानंतर पण निहारला अजूनही दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड म्हणूनच ओळखलं जातं.

दीपिकासोबत सतत नाव जोडलं जात असल्याने अखेर वैतागून निहारने प्रसारमाध्यमांसमोर ही विनंती केली आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याला दीपिकाबद्दल प्रश्न विचारलं असता तो म्हणाला, ‘तिचं आता लग्न झालं आहे. ती तिच्या वैवाहिक जीवनात खूश आहे. माझ्या मनात तिच्याबद्दल कसलीही कटुता नाही. तिला तिच्या पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. पण आता माझं नाव तिच्यासोबत जोडू नका. माझ्या लग्नाबद्दल ज्या बातम्या येत आहेत त्यात माझी ओळख दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड म्हणून नाही तर स्वत:च्या नावाने व्हावी असं मला वाटतं.’

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like