‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिक प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा नुकताच दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा मोदींचा प्रवास या बायोपिक दाखवण्यात आला आहे. याची झलक दोन्ही ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
अभिनेता विवेक ओबेरॉय या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. विवेक ओबेरॉयसह बोमन इराणी, इरीना बहाव, बरखा बिष्ट, मनोज जोशी, प्रशांत नारायणन यांसारखे कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. २४ मे रोजी भारतासह तब्बल ४० देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.