‘Game of Thrones 8’चा टीजर प्रदर्शित….!

हॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही शो ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या आठच्या सीझनची घोषणा झाली आहे.आता या शोचा टीजर रिलीज करण्यात आलाय. शिवाय शोची रिलीज डेटही जाहिर करण्यात आलीय. त्यानुसार, येत्या 14  एप्रिलला शो रिलीज होणार आहे.

‘गेम ऑफ थ्रोन्स 8’चा टीजर येताच चाहते क्रेजी झालेले दिसून येत आहे. या टीजरमध्ये तीन महत्त्वपूर्ण पात्रांना दाखवण्यात आले आहे. जे आपल्या पुर्वजांच्या घरात हातात तलवार घेऊन फिरत आहेत. ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे फायनल सीझनचा शेवट कसा असेल, याचा अंदाज या टीजरवरून येतोय.

‘गेम ऑफ थ्रोन्स 8’मध्ये केवळ 6 एपिसोड असतील, असे म्हटले जात आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ हा शो अंतिम टप्प्यावर आहे. मात्र असे अनेक पैलू आहेत जे 6 एपिसोडमध्ये दाखवणे मेकर्ससाठी सोपे नव्हते. आर्यन थ्रोनवर कोण बसणार? Azor Ahai कोण आहे? CleganeBowl कोण जिंकणार आणि  Cersei ला कोण मारणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. या सीझनमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार, अशी अपेक्षा आहे.

महत्वाच्या बातम्या –