‘तारक मेहता’मधून दयाबेन घेणार एक्झिट?

सोनी टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘दयाबेन’ गेल्या अनेक काळापासून मालिकेपासून दूर आहे. या मालिकेला आता मोठा धक्का बसणार आहे. कारण ‘दया बेन’ मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. ‘दया बेन’ म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी या पुन्हा एकदा या मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

‘बॉलिवूड लाइफ डॉट कॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार, दिशा वकानी पुन्हा मालिकेत काम करणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत मालिकेचे निर्माते अस्ती कुमार मोदी यांना विचारले असता, ‘कदाचित हे खरंही असू शकतं परंतु या निर्णयाबाबत मला माहीत नसून माझी संपूर्ण टीम दिशाशी बोलत असल्याचं’ त्यांनी म्हटलंय.

दिशा वकानी यांनी निर्मात्यांसमोर आपला वेळ आणि पैशांसंदर्भात काही अटी ठेवल्या होत्या. ज्या निर्मात्यांनी मानल्या नाहीत. त्यामुळे अखेर दिशा वकानी यांच्यासोबतचा करार संपवण्यात आला आहे, अशी माहिती एका मासिकाने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like