लवकरच पडद्यावर जुळणार ‘३६ गुण’

समित कक्कड यांनी ‘आयना का बायना’, ‘हाफ तिकीट’ अशा मराठी चित्रपटातून आपलं कौशल्य सिद्ध केलेलं आहे. आता समित एक वेगळ्या विषयावर बेतलेला ’३६ गुण’ हा नवा चित्रपट घेऊन पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे लंडन मधले चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाचे उर्वरित चित्रिकरण गोव्यात होणार आहे. संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार यांची मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लिखाणाच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीसाठी प्रसिद्ध असलेले यशस्वी चित्रपट लेखक हृषिकेश कोळी सोबत ‘आश्चर्य चकित’, ‘बच्चन’ आणि ‘३६ गुण’ असे सलग तीन चित्रपट करत असल्याने  आगामी काळात समित कक्कड यांचे हे सगळे चित्रपटे रुपेरी पडदा नक्कीच गाजवतील व त्यांचे ‘३६ गुण’ रसिकप्रेक्षकांना आश्चर्यचकीत करतील ह्यात शंकाच नाही.

महत्वाच्या बातम्या –