‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाचा बॉलीवूडला रामराम!

सुशांत सिंह रजपूत याच्या आत्महत्येमुळे हिंदी सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीत काम करणाऱ्या काही अभिनेते-अभिनेत्र्यांनी आपली खडखड व्यक्त केली आहे. सिनेसृष्टीतील काही बडे कलाकार, दिग्दर्शक इत्यादी मंडळी कशाप्रकारे इतरांचे शोषण करतात याबाबत अनेक कलाकारांनी दावे केले आहेत.

अशातच आता ‘थप्पड’ या नावाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी बॉलीवूडला रामराम ठोकला आहे. याबाबतची माहिती सिन्हा यांनी आपल्या अधिकृत ट्विटरखात्यावरून दिली असून त्यांनी आपण यापुढे बॉलिवूड सिनेमे करणार नसल्याचं सांगितलंय.

सिन्हा यांनी जरी बॉलीवूडला रामराम ठोकला असला तरी ते दिग्दर्शनापासून दूर जाणारा नाहीयेत. त्यांच्या चाहत्यांना यापुढे देखील त्यांनी दिग्दर्शित केलेल्या कलाकृतींचा आस्वाद घेता येणार आहेत. आपल्या निर्णयाबाबत सांगताना ते म्हणतात, आपण यापुढे बॉलीवूडसाठी नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीसाठी सिनेमे बनवणार आहोत.

 

 

You might also like