उपेंद्र सिधये यांचे ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण

हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी पटकथा आणि संवाद लिहिणारे उपेंद्र सिधये ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. “निर्मात्यांच्याप्रोत्साहनातून ‘गर्लफ्रेंड’ ही कलाकृती तयार होऊ शकली”, असे मत त्यांनी चित्रपटाविषयी बोलताना व्यक्त केले. अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी याचित्रपटाची निर्मिती केली आहे. उपेंद्र सिधये यांनी ‘मुंबई मेरी जान’ पासून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करत, ‘द्रीष्यम्’, ‘किल्ला’, ‘मांजा’ अशा लोकप्रियआणि विविध धाटणीच्या चित्रपटांसाठी पटकथा व संवाद लेखन केले.

ह्यूज प्रॉडक्शन्स आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात गर्लफ्रेंड शोधणाऱ्या मुलाच्या भूमिकेसाठी सुरुवातीपासूनच अभिनेता अमेय वाघचे नावनिश्चित झाले होते, नंतर अलिशा या गर्लफ्रेंडचे पात्र ताकदीने पेलू शकेल अशा अभिनेत्रीची निवड करण्याची वेळ आली, तेव्हा नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिकासाकारणारी अभिनेत्री सई ताम्हणकर हिचे नाव निश्चित करण्यात आले . असा हटके विषय असलेला ‘गर्लफ्रेंड’ हा चित्रपट येत्या २६ जुलै २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.