दिलीप कुमार व सायरा बानो यांची नात सायशा सहगल अडकणार विवाहबंधनात

दिलीप कुमार व सायरा बानो यांची नात सायशा सहगल लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. एका चित्रपटात सोबत काम करत असताना आर्या व सायशा एकमेकांच्या प्रेमात पडले. आता दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला असून येत्या ९ व १० मार्चला सायशा व आर्या दोघेही लग्नगाठ बांधणार आहे.

आर्या हा सायशापेक्षा १७ वर्षांनी मोठा आहे. मात्र दोघांच्याही कुटुंबानी हे नाते मान्य केले आहे. हैदराबाद मध्ये हा शाही विवाह सोहळा होणार असून यानंतर चेन्नई मध्ये रिसेप्शन होणार आहे.

सायशा ही अभिनेता सुमित सहगल व अभिनेत्री शाहिन बानो यांची मुलगी आहे. आर्या साऊथचा एक लोकप्रीय अभिनेता आहे. याशिवाय चेन्नईतील एका अलिशान हॉटेलाचा मालक आहे. त्याची ‘द शो पीपल’ नामक एक प्रॉडक्शन कंपनीही आहे. या कंपनीद्वारे नवीन टॅलेंटला संधी दिली जाते.

महत्वाच्या बातम्या –