गाड्या वापरणं बंद केलंस की ट्विटर?

अक्षय कुमारचे जुने ट्वीट जितेंद्र आव्हाडांनी  ‘कोट-रीट्वीट’ केले आहे. “तू ट्विटरवर अक्टिव्ह  नाहीस का? तू गाड्या वापरणं बंद केलंस का? तू वर्तमानपत्र वाचत नाहीस का? तुझ्या माहितीसाठी सांगतो, प्रचंड मोठी पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली आहे” असे ट्वीट करत आव्हाडांनी अक्षयकुमारला मेन्शनही केले आहे.

“मी रात्री माझ्या घरीसुद्धा जाऊ शकलो नाही, कारण इंधनाच्या किमती पुन्हा रॉकेटप्रमाणे वाढण्याआधी संपूर्ण मुंबई पेट्रोलसाठी रांगा लावत होती.” असे ट्वीट अक्षयकुमारने 16 मे 2011 रोजी केले होते.

2011 मध्ये केंद्रात मनमोहन सिंह यांचे सरकार होते, तर महाराष्ट्रातही पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. आता मोदी सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा गगनाला भिडले असताना अक्षयकुमारने मौन साधल्याने जितेंद्र आव्हाडांनी त्याला डिवचले.

 

You might also like