कार्तिक आर्यनचा ‘पति-पत्नी और वो’ सिनेमातील लुक तुम्ही पाहिलात का ?

कार्तिक आर्यनचा ‘पति-पत्नी और वो’ सिनेमातील पहिला लुक समोर आला आहे. कार्तिकन स्वत: त्याचा सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. इंन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याने सिनेमातील त्याच्या नावाचा खुलासा केला आहे.

फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने ‘मिलिए लखनऊ के चिंटू त्यागी जी से’. असे लिहीले आहे. फोटोमधील त्याचा या लुकला पाहून हा सिनेमा मध्यम वर्गीय कुटुंबावर आधारित आहे असं दिसून येत आहे. त्याचप्रमाणे त्याने सिनेमात मिश्याही ठेवल्या आहेत.

सिनेमात अभिनेत्री भूमि पेडणेकर आणि अभिनेत्री अनन्या पांडे मुख्यभूमिकेत झळकणार आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज करणार असुन निर्मिती भूषण कुमार, जूनो चोप्रा आणि अभय चोप्रा करणार आहेत. १९७८ साली आलेल्या ‘पति पत्नी और वो’चा हा सिनेमे रिमेक असणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन बलदेव राज चोप्रा यांनी केले होते.

महत्वाच्या बातम्या –

You might also like