‘आनंदी गोपाळ’चा टीझर पाहिलात का?

महाराष्ट्रातच नाही, तर जगभरात भारताच्या पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी यांचे नाव सर्वपरिचीत आहे. त्यांनी अनेक कठिण प्रसंगाचा सामना करत, समाजाचा रोष पत्कारत विदेशात जाऊन शिक्षण घेतले. त्यांनी भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा सन्मान मिळविला. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज करण्यात आला आहे.

अभिनेता ललित हा आनंदीबाईच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे गोपाळराव यांची भूमिका साकारत आहे. ललितची चित्रपटाच्या टिझरमध्ये गोपाळरावांची दमदार भूमिका साकारत दिसत आहे. आनंदी गोपाळ यांच्यावर श्री. ज. जोशी यांनी कादंबरी लिहिली होती.आता मोठ्या पडद्यावर हा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

वयाच्या दहाव्या वर्षी आनंदीबाई यांचे गोपाळराव जोशी यांच्याशी लग्न झाले होते. गोपाळरावांनी लग्नानंतर आनंदीबाईंना शिकविले. पुढे अमेरिकेत पाठवून त्यांचे शिक्षण पूर्ण केले.गोपाळराव आणि आनंदीबाईंना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. मात्र, आनंदीबाईंची जिद्द आणि त्यांचा डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात आनंदीबाईच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 15 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –