सुशांतची एक्स मॅनेजर सुरज पांचोलीच्या बाळाची आई बनणार होती ?

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी वेगवेगळी कारणे समोर येऊ लागली आहे. यामुळे सध्या त्याच्या चाहात्यांचा राग अनावर झालेला दिसतो. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार आता सुशांत सिंह राजपूतच्या केस मध्ये सुरज पंचोलीचे नाव समोर येत आहे. सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूतच्या एका फॅनने एक सणसणीत खुलासा केला आहे ज्यामध्ये त्याने सुशांत सोबतच त्याची एक्स मॅनेजर दिशा बद्दल सुद्धा सांगितले.

सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी काही दिवस आधीच त्याची एक्स मॅनेजर दिशाने सुद्धा १४ व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली होती. त्यामुळे सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या आणि दिशाची आत्महत्या याप्रकरणात समान धागेदोरे काय हे शोधले जात आहेत. सोशल मीडियावर असे म्हटले जात आहे की सुशांत सिंह राजपूत ची एक्स मॅनेजर दिशा सालियान ही सुरज पंचोली ची गर्लफ्रेंड होती. एवढेच नव्हे तर असेही म्हटले जाते आहे की दिशा सुरज च्या बाळाची आई बनणार होती.

हे प्रकरण इथेच थांबले नसून सुरज पंचोली चे नाव सुशांत सिंह राजपूत च्या केस मध्ये सुद्धा जोडले गेले. सुशांत आणि सलमान खान मध्ये सुरज पंचोली मुळे वाद झाले होते. पाणी डोक्यावरून गेल्यावर आता सुरज पंचोली त्याचे मौन सोडले असून एक मोठा खुलासा केला आहे.

सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या आरोपांबाबत सूरज पांचोली ने एका इंटरव्यू मध्ये सांगितले की, तो दिशा सालियानला ओळखत सुद्धा नव्हता. तर मग तिच्यासोबत माझे अफेअर कसे असेल. पुढे सूरजने सांगितले की दिशा बद्दलची माहिती त्याला मीडियामधून मिळाली होती आणि तो तिला कधीच भेटला नव्हता. पुढे सुरज म्हणाला, जी व्यक्ती आता या दुनियेत राहिली नाही तिच्याबद्दल असे चुकीचे बोलणे चांगले नाही. तिच्या परिवाराचा विचार करा आणि अशा चुकीच्या अफवा पसरवणे बंद करा.

सुरज पुढे म्हणाला, ही संपूर्ण गोष्ट एका चित्रपटाच्या स्क्रिप्ट प्रमाणे लिहिली गेली आहे. ज्याला कोणताच ठोस अर्थ नाही. मी स्वतः अशा स्टेटमेंट वर माझे मत मांडून वेळ वाया घालवत आहे पण आता आपल्या सगळ्यांनाच ज्या व्यक्ती या जगातच नाही त्यांच्या बाबत बोलणे थांबवले पाहिजे. दिशाच्या आत्महत्ये नंतर सुरज पंचोली चे नाव या प्रकरणात पुढे आले होते. या दोघांचे अफेअर असल्याचे म्हटले जात होते पण या सर्व अफवा असल्याचे सांगून सुरज पंचोली ने याप्रकरणी फुलस्टॉप दिला आहे.

You might also like