काळी जादू करण्यासाठी रियाने केला सुशांतच्या पैशांचा वापर?

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन जवळपास दीड महिना उलटला आहे. १४ जुलै २०२० रोजी सुशांतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पण त्याच्या आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अनेक कलाकारांनी याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे.

सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी रिया चक्रवर्ती हिच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यातच आता काळी जादू करण्यासाठी रियाने सुशांतच्या खात्यातून २.९३ लाख रुपये काढल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या या प्रकरणाला वेगळंच वळण लागल्याचं दिसून येत आहे.

पूजा करण्यासाठी रियाने सुशांतच्या खात्यातून जवळपास २.९३ लाख रुपये काढले होते. मात्र रियाने कोणत्याही प्रकारची पूजा केली नाही. त्यामुळे रियाने सुशांतवर काळी जादू करण्यासाठीच हे पैसे काढल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

ही पूजा २०१९ मध्ये होणार होती. परंतु, ती झाली नाही. सुशांतची बहीण या खात्याची नॉमिनी असल्यामुळे या खात्यातून रक्कम काढण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली. तसंच सुशांत प्रत्येक वेळी बॅकेतून पैसे काढल्यानंतर त्याचा हिशोब लिहून ठेवत होता. मात्र त्याने काढलेली रक्कम नेमकी कोणत्या कारणासाठी वापरली हे स्पष्ट झालेलं नाही. तो लहान सहान खर्च किंवा रियासाठी केलेला खर्च कधी लिहून ठेवत नव्हता असे सांगण्यात आले आहे.

 

You might also like