आली रे आली आपल्या नवीन गाण्यासहीत ‘ढिनचॅक पूजा’ आली

‘सेल्फी मैंने ले ली आज’ म्हणत धुमाकूळ घालणारी ढिनचॅक पूजा परतली आहे आपले एक नवीन गाणे घेऊन. ढिनचॅक पूजा अशी गायिका आहे जिनं हे सिद्ध केलंय की गायिका बनण्यासाठी तुम्हाला गाणं गाता यावं, असं काहीही नाही किंवा तुमच्या ‘टॅलेंट’चं कौतुक व्हावं असंही नाही. ढिनचॅक पूजाचं ‘सेल्फी मैंने ले ली आज’नं सोशल मीडियावर खूप प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. नुकतंच पूजाचं नवं गाणं ‘नाचे जब कुडी दिल्ली की’ प्रदर्शित करण्यात आले आहे.

पूजाच्या यूट्यूब चॅनलवर हे गाणं २० जानेवारी रोजी अपलोड करण्यात आलं. ढिनचॅक पूजा आपल्या विचित्र गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे गाणंदेखील लोकांना तसंच वाटण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –