अभिनेता धर्मेंद्र हे शेतकर्यांच्या त्रासाने परेशान, ट्वीट करून सरकारला दिला सल्ला…

3 नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी शेतकरी 16 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. बॉलिवूड अभिनेता आणि राजस्थानमधील बिकानेरचे माजी खासदार धर्मेंद्र शेतकर्यांचे हाल पाहून दुखी झाले आहेत. धर्मेंद्र यांनी सोशल ट्विटरवर ट्वीट करून म्हटले आहे की, ‘माझ्या शेतकरी बांधवांचे दु: ख पाहून मला फार वाईट वाटले. सरकारने लवकरच हे प्रकरण सोडवायला हवे.
I am extremely in pain to see the suffering of my farmer brothers . Government should do something fast . pic.twitter.com/WtaxdTZRg7
— Dharmendra Deol (@aapkadharam) December 11, 2020
धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल हे पंजाबमधील गुरदासपूर येथील भाजपा खासदार आहेत, तर पत्नी हेमा मालिनी मथुराच्या भाजपा खासदार आहेत. ८४ वर्षाचे धर्मेंद्र हे मुंबईजवळील फार्महाऊसमध्ये एकटे राहून सेंद्रिय शेती करतात. त्याच्याकडे बरीच गायी आहेत. यावेळी ते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओही शेअर करतात.