……म्हणून धर्मेंद्र म्हणाले आता हे दृश्य सहन होत नाही

करोना रुग्णांच्या संख्येत रोजचवाढ होतांनादिसून येत आहे. रुग्णांच्या झपाट्याने वाढत असलेल्या नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे मनोरंजन उद्योग पूर्णपणे ठप्प पडला आहे. परिणामी देशभरातील अनेक कलाकार बेरोजगार झाले आहेत.

अशा प्रतिकूल परिस्थितीत रिकामी सिनेमागृह पाहून अभिनेता धर्मेंद्र मात्र दु:खी झाले आहेत. ट्विट करत धर्मेंद्र यांनीआपलं दु:ख व्यक्त केलं आहे. धर्मेंद्र यांनी राखी सिनेमागृहाचा फोटो पोस्ट केला आहे.

“राखी सिनेमागृह, लुधियाना… इथे आम्ही कित्येक चित्रपट पाहिले आहेत. आता ही शांतता सहन होत नाही. उदास व्हायला होतं.” अशा आशयाचे ट्विट करुन धर्मेंद्र यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. धर्मेंद्र ते समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर आपली प्रतिक्रिया देत असतात. या पार्श्वभूमीवर त्याचे हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

 

कतरिना आणि तिच्या बहिणीचे फोटो पाहिलेत का?

You might also like