‘या’ अभिनेत्याच्या मागे वेडी होती दीपिका

दीपिका पदुकोण सध्या बॉलिवूडची सर्वात आघाडीची अभिनेत्री आहे. अभिनयसोबतच दीपिका तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकानं तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी तिनं तिच्या एका मजेदार सवयीचा खुलासा केला.
दीपिकानं नुकातंच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, मी आणि माझी बहीण अनिशा बालपणी रुम शेअर करायचो. आम्ही सोफ्यावर बसून तासंतास खेळायचो. आमच्या घराच्या भिंतीवर त्यावेळी टायटॅनिकचा अभिनेता लिओनार्डो डीकॅप्रिओची बरीच पोस्टर होती.आम्ही दोघंही झोपण्याआधी त्यावर किस करून त्याला गुडनाइट म्हणायचो आणि मग झोपायचो.
दीपिका पदुकोण नेहमीच तिच्या बहिणीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. एका मुलखातीत तिनं सांगितलं होतं की तिची बहीण तिची सर्वात मोठी समीक्षण आहे. दीपिका म्हणाली, मी कधीच माझ्या बहीणीच्या बोलण्याचं वाईट वाटून घेत नाही. करण मला माहित आहे की ती खूप प्रामाणिक आहे. तिला नेहमी वाटतं की माझ्या आयुष्यात मी सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे कराव्या.
लवकरच दीपिका रणवीर सिंहसोबत 83 या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती कपिल देव यांच्या पत्नीची म्हणजेच रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारत आहे. लग्नानंतर रणवीर दीपिकाचा एकत्र हा पहिलाच सिनेमा आहे.
मीरा राजपूतने लग्नासाठी ठेवली होती विचित्र अट; जाणून घ्या काय होती नेमकी ही अट