दीपिका झळकणार यशराज फिल्म्सच्या चित्रपटात

अभिनेत्री दीपिका पदुकोन लवकरच यशराज फिल्म्स कंपनीच्या चित्रपटात दिसणार आहे. कंपनीने दीपिकाला आगामी चित्रपटाबद्दल विचारणा केली आहे. विशेष म्हणजे यशराज फिल्म्सला 50 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अनेक चित्रपटांची घोषणा कंपनीने केली आहे.

प्रिया बेर्डेनंतर मराठीतील ‘ही’ अभिनेत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश!

दीपिकाने अद्याप फिल्म साइन केलेली नाही. ऋतिक आणि टायगर यांचा “वॉर’ हा चित्रपट दिग्दर्शित करणारे सिद्धार्थ आनंद हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.या चित्रपटाबद्दलची चर्चा दीपिकासोबत लॉकडाऊनच्या अगोदरच सुरू होती. आता प्रभासच्या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर या चित्रपटाविषयीही चर्चा केली जात आहे. या चित्रपटात दीपिका लीड रोलमध्ये पाहायला मिळणार आहे.

‘या’ मुलाला अल्काने धक्के मारून काढले होते स्टूडियोच्या बाहेर,आज आहे प्रसिद्ध अभिनेता

दीपिकासोबत काम करण्यासाठी अजूनतरी कोणाचीही निवड करण्यात आलेली नाही. मात्र दीपिकाचा हिरो सलमान खान, आमिर खान किंवा शाहरूख खान यापैकीच एक असेल असे सांगण्यात आले आहे.

You might also like