दीपिकाने सांगितलं एक खास सिक्रेट, म्हणाली रणवीर रात्री…

सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणजे रणवीर सिंग व दीपिका पदुकोण. या दोघांची ऑफस्क्रीन व ऑनस्क्रीन केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. सध्या सोशल मीडियावर दीपिकाचा एका पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

या पुरस्कार सोहळ्यात स्टेजवर दीपिका रणवीरबद्दलच्या काही खास गोष्टी सांगताना दिसत आहे.‘फेमिना ब्युटी अवॉर्ड्स’मध्ये तिने हजेरी लावली होती. याच कार्यक्रमादरम्यान तिने रणवीरच्या काही सवयींचा खुलासा केला.

दीपिकाला रणवीरच्या ब्युटी सिक्रेटबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना दीपिका म्हणाली, “रणवीर अंघोळीला खूप जास्त वेळ घेतो आणि टॉयलेटमध्येही तो बराच वेळ असतो. त्याला तयार व्हायला माझ्यापेक्षाही जास्त वेळ लागतो आणि अंथरुणात यायलाही तो फार वेळ लावतो.” तिचं हे उत्तर ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यावर सावरून घेत ती पुढे म्हणते, “मला असं म्हणायचं होतं की तो अंथरुणात झोपायला फार वेळ लावतो.”

दरम्यान, लवकरच दीपिका रणवीर सिंहसोबत 83 या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती कपिल देव यांच्या पत्नीची म्हणजेच रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारत आहे. लग्नानंतर रणवीर दीपिकाचा एकत्र हा पहिलाच सिनेमा आहे.

‘या’ अभिनेत्याच्या मागे वेडी होती दीपिका

You might also like