दीपिकाने रणवीरची रिल लाइफमध्ये पत्नी बनण्यास दिला नकार

रणवीर सिंग व  दीपिका पादुकोण रिल लाईफमध्ये पती पत्नीच्या भूमिकेत झळकणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाने रिल लाईफमध्ये पत्नी बनण्यास नकार दिला आहे.

दीपिका पादुकोण सध्या तिच्या आगामी सिनेमा ‘छपाक’च्या कामाला सुरवात केली आहे.याच दरम्यान रणवीर सिंगचा आगामी चित्रपट ‘८३’साठी दीपिका पादुकोणला देखील विचारण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. या चित्रपटात दीपिका कपिल देवची पत्नी रोमीची भूमिका करण्यासाठी विचारले व निर्मात्यांच्या नुसार दीपिका हे काम एका आठवड्यात पूर्ण करू शकते.

मात्र, दीपिकाने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले असून लक्ष्मी अग्रवालवरील बायोपिक छपाकच्या आधी कपिल देवचा बायोपिक ‘८३’मध्ये दिसून तिला छपाकबाबतची प्रेक्षकांमधील उत्सुकता कमी करायची नाही. रणवीरनेदेखील ‘८३’च्या निर्मात्यांना दीपिकावर दबाव आणू नका असे सांगितले. आता दीपिका याबाबत काय निर्णय घेते, याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like