‘या’ चिटपटत झळकणार रणवीर – दीपिका एकत्र

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण लवकरच पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करण्यास सज्ज झाले आहेत. कबीर खान दिग्दर्शित ’83’ या चित्रपटामध्ये दीप-वीर एकत्र येणार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, ’83’ मध्ये दीपिका कपिल देव यांच्या पत्नीची रोमी भाटिया यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटासाठी दीपिकाला विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर दीपिकानेदेखील या चित्रपटासाठी तिचा होकार कळविला आहे.

चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क,चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

 

You might also like