भावनिक झाली रामायणातील सीता म्हणाली….

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या ऐतिहासिक भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. आज हा सोहळा पार पडला . या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आले आहे. या द्वारेच निमंत्रितांना भूमिपूजनाच्या स्थळी प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान, भूमिपूजनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून निमंत्रितही या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आहे.

राम मंदिर बांधण्यास सुरुवात होणार असल्याने रामायणात सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया खूप आनंदी आहे. तिने म्हंटले कि, ‘असे दिसते की, दिवाळी लवकर आली आहे.’

दीपिकाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे, ज्यात तिने राम मंदिर बांधण्याविषयी सांगितले – उद्या राम जन्मभूमी शिलान्यास होईल. अखेरीस दीर्घ प्रतीक्षा संपली. रामलल्ला घरी परतत आहे. हा एक अतिशय विलासी अनुभव असेल. असे वाटत आहे कि, यंदा दिवाळी लवकर आली आहे. हा सर्व विचार करून मी अत्यंत भावनिक होत आहे. उद्याची प्रतीक्षा आहे.

You might also like