‘हा’ पदार्थ दीपिका आयुष्यभर न कंटाळता खाऊ शकते 

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यामातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा पर्यंत करत असते.

यावेळी दीपिकाने आपल्या चाहत्यांसोबत गप्पा मारण्यासाठी इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅट केलं होतं. या चॅटमध्ये तिच्या एका चाहत्याने तिला तिचा आवडता पदार्थ काय आहे जो तू न कंटाळता दररोज खाऊ शकतेस? असा प्रश्न विचारला चाहत्याच्या या प्रश्नावर दीपिकाने देखील भन्नाट उत्तर दिल आहे.

या प्रश्नावर दीपिकाने तिचा आवडता पदार्थ सांगितला. पांढरा भात, सरम आणि त्यासोबत आंब्याचं लोणचं ती आयुष्यभर खाऊ शकते. यानंतर आणखी एका चाहत्याने लॉकडाउन नंतर ती सर्वप्रथम काय करणार? असा प्रश्न विचारला. यावर दीपिका म्हणाली लॉकडाउन संपताच ती आपल्या आई-वडिलांना जाऊन भेटणार आहे असे तिने सांगितले. चाहत्यांनी यावेळी अनेक प्रश्न तिला विचारले व तिने त्याचे उत्तर सुद्धा दिले.

You might also like