अजय देवगणचा ‘हा’ चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत

अजय देवगणचा  ‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट येत्या १७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण मुख्य भूमिका साकारणार असून तब्बू आणि रकुल प्रीत सिंह त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत.

या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ‘यू/ए’ प्रमाणपत्र दिलं आहे. मात्र या चित्रपटामधील तीन सीनला सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. सेन्सॉरने या चित्रपटातील एका गाण्यात बदल करायला सांगितला असून त्याच्यासोबत दोन सीन आणि त्यातील संवाद बदलण्यास सांगितले आहेत.

 

You might also like