डेव्हिड वॉर्नरच्या मुलींचा भन्नाट डान्स व्हायरल, पाहा व्हिडिओ
व्हायरल

क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याचं भारतप्रेम सगळ्यांनाच माहिती आहे. बॉलिवूडच्या गाण्यांचंही त्याला फारच वेड आहे. नुकताच त्याने बॉलिवूडच्या शीला की जवानी या प्रसिद्ध गाण्यावर डान्स केला होता. तसंच डेव्हिड वॉर्नरने आपलं दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीवर असलेलं प्रेमदेखील दाखवून दिलं होते. अल्लू अर्जुन याच्या बुट्टाबोम्मा आणि ज्युनियर एनटीआरच्या पक्का लोकल या गाण्यांवर त्याने डान्स करत व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
आता वॉर्नरच्या मुलींचा बॉलिवूड चित्रपटातील गाण्यावर केलेला डान्स तुफान व्हायरल होतांना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये डेव्हिड वॉर्नरच्या मुली अक्षय कुमारच्या हाऊसफुल ४ चित्रपटातील बाला या गाण्यावर नाचताना दिसत आहे.
डेव्हिड वॉर्नर आणि त्याची पत्नी कँडिस वॉर्नर यांनी लॉकडाउन काळात साऱ्यांचं भरपूर मनोरंजन केलं.काही वेळा त्यांच्यातील रोमँटिक अंदाजही दिसून आला. पण आता ‘हम कुछ कम नही’ म्हणत त्याच्या लेकींनीही बॉलिवूडच्या बाला या अक्षय कुमारवर चित्रित झालेल्या गाण्यावर डान्स केला.