दंगलचे दुसरे गाणे ‘धाकड़ छोरी’ रिलीज

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा आगामी सिनेमा ‘दंगल’मधील ‘धाकड छोरी’ हे दुसरे भन्नाट रिलीज करण्यात आले आहे.

दिवस-रात्र मेहनत करुन गीता आणि बबीता कुस्तीच्या मैदानात कशाप्रकारे मुलांना धुळ चारतात, हे या गाण्यामध्ये दाखवण्यात आले आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गाण्याचे बोल लिहिले असून प्रीतम यांनी गाण्याला संगीत दिले आहे. ‘दंगल’ सिनेमामध्ये आमीर खान सुप्रसिद्ध कुस्तीपटू महावीर फोगट यांची भूमिका साकारत असून हा सिनेमा 23 डिसेंबरला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.