सुलतानपेक्षा ‘दंगल’ खूपच चांगला सिनेमा- सलमान खान

सुलतानपेक्षा दंगल खूपच चांगला सिनेमा असल्याचं सलमान खान ने ट्विटर च्या माध्यमातून सांगितले.

“माझं कुटुंब दंगल पाहण्यास गेलं होतं. त्यांच्या मते सुलतानपेक्षा दंगल खूपच चांगला सिनेमा आहे. आमीर तू वैयक्तिक जीवनात मला आवडतोस, मात्र व्यावसायिक जीवनात मी तुझा तिरस्कार करतो” असं ट्विट सलमानने केलं.

यावर आमीर खाननेही सलमानला रिप्लाय दिला आहे. आमीरने तुझ्या तिरस्कारातही मला प्रेम दिसतं. आय लव्ह यू लाईक आय हेट यू’ असं ट्वीट केलं आहे.

 

दंगल हा सिनेमा कुस्तीपटू महावीर सिंह फोगट यांच्यावर आधारित आहे. यापूर्वी सलमान खाननेही कुस्तीवर आधारित सुलतान हा सिनेमा केला होता

You might also like