उत्तर प्रदेशमध्ये आमीर खानचा ‘दंगल’ टॅक्स फ्री

लखनऊ : अभिनेता आमीर खानचा ‘दंगल’ सिनेमा उत्तर प्रदेशमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सिनेमा टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली आहे. देशभरात आज आमीरचा ‘दंगल’ सिनेमा रिलीज झाला आहे.

‘दंगल’ टॅक्स फ्री केल्यामुळे तिकीटाचे दर राज्यभर स्वस्त होतील. ज्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांना सिनेमा पाहता येईल.

सिनेमा रिलीज झाल्याच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. समीक्षकांनीही सिनेमाला 4 स्टार रेटिंग दिलं आहे

You might also like