‘दंगल’ची दोन दिवसांत तब्बल ६४.६० कोटींची कमाई

शुक्रवारी भारतात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने देशात नोटाबंदीचे वातावरण असूनही दोन दिवसांत तब्बल ६४.६० कोटींची कमाई केली आहे. दंगलने पहिल्या दिवशी २९.७८ कोटी तर दुस-या दिवशी ३४.८२ कोटी इतकी कमाई केली आहे. या कमाईत तमिळ आणि तेलगूमधील व्हर्जनच्या कमाईचा आकडादेखील आहे. शुक्रवारी कोणतीही सार्वजनिक सुट्टी नसतानाही चित्रपटाने पहिल्या दिवशी केलेली कमाई नक्कीच उल्लेखनीय असल्याचे म्हटले जातेय. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दंगलच्या कमाईचा आकडा ट्विट करून ही माहिती दिली. तसेच, तीन दिवसांत हा चित्रपट १०० कोटींचा आकडा पार करेल अशी शक्यताही त्यांनी वर्तविली आहे. ख्रिसमसच्या अनुषंगाने तारे जमिन पर, गजिनी, ३ इडियट्स, धूम ३, पीके आणि आता दंगल यांसारखे चित्रपट देणा-या आमिरच्या यशाचा आलेख हा उंचावत राहिला आहे.

 

You might also like