टीव्हीचा ‘हा’ प्रसिद्ध सेलिब्रेटी अडकला विवाहबंधनात

प्रसिध्द डान्सिंग रियालिटी शो ‘डान्स इंडिया डान्स’च्याचा एक्स कंटेस्टंट प्रिन्स गुप्ता लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवी सुरूवात केली आहे. गर्लफ्रेंड सोनम लाडियासह तो विवाहबंधनात अडकला आहे.

गुजरातमध्ये या दोघांचे लग्न नुकतंच पार पडले. या नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी कुटुंबासह मित्रमंडळीही उपस्थित होते. सध्या या कपलच्या लग्नाचे अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रिन्सच्या लग्नात प्रसिध्द कोरियोग्राफर फिरोज खाननेही हजेरी लावली होती. “दोघं रेशीमगाठीत अडकल्याचे पाहून अत्यंत आनंद झाला. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात अडकले आणि आता आपल्या जीवनाचा नवा अध्याय सुरू करतात हे पाहून खूप छान वाटत आहे”. अशा शब्दांत फिरोज खान यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या –