तिवरे धरण: ‘हा तुम्ही खून केलाय की वध’??; जितेंद्र जोशींचा सरकारला सवाल

चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानं यामध्ये २४ जण वाहून गेले. आतापर्यंत ९ जणांचे मृतदेह हाती लागले आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर यावरून विरोधक आक्रमक होताना दिसत आहे. या घटनेवरून विरोधकांकडून स्तरावर जोरदार टीका केली जात आहे. विरोधकनंतर आता अभिनेता जितेंद्र जोशी यानेही सरकारविरोधात सवाल उपस्थित केला आहे.
अभिनेता जितेंद्र जोशी चांगलाच संतापला आहे. अवघ्या 20 वर्षापूर्वी बांधलेलं तिवरे धरण फुटतं? 9 जण मृत्युमुखी! 24 जण बेपत्ता हा तुम्ही खून केलाय की वध??, असा सवाल त्याने सरकारला विचारला आहे.
अवघ्या 20 वर्षापूर्वी बांधलेलं
तिवरे धरण फुटतं?
9 जण मृत्युमुखी!
24 जण बेपत्ता..
आसपासच्या गावकर्यांनी तक्रार करूनही याची दखल घेतली गेली नाही. हा वध आहे की खून?? की दुर्लक्षिलेला मृत्यु!!— jitendra shakuntala joshi (@jitendrajoshi27) July 3, 2019