कास्टिंग काऊच्याबाबत डेली सोप क्वीन म्हणाली…

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला. पण त्याच्या निधानानंतर सोशल मीडियावर घराणेशाही हा वाद पेटून उठला आहे. तर दुसरीकडे बॉलीवूडमध्ये पूर्वी पासून कास्टिंग काऊच्या मुद्यावरून अनेक वाद निर्माण झाले आहे. अनेक अभिनेत्री मी टू मोहिमेच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये होणाऱ्या कास्टिंग काऊच्याबाबत आपलं अनुभव सांगितले आहे.
यातून अनेक वेळा दिगदर्शकामध्ये वाद पेटून उठला आहे. यातच डेली सोप क्वीन अशी टीव्ही मालिका आणि चित्रपट निर्माती एकता कपूर हिची ओळख. बेधडक आणि रोखठोक भूमिका मांडण्यामुळे एकता कायम चर्चेत असते. बॉलीवुडमध्ये होणा-या लैंगिक शोषणावरही एकता कपूर परखड मत मांडताना दिसते.
तिने सांगितले आहे की,’ या क्षेत्रात लैंगिक शोषण होत असलं तरी केवळ निर्मातेच आपल्या पदाचा गैरफायदा घेतात असं नाही, तर कलाकारही काम मिळविण्यासाठी लैंगिक संबंध ठेवण्याची तयारी ठेवतात असं धक्कादायक विधान एकता कपूर हिने केले होते. ”
ती पुढे म्हणाली,’एक निर्माता आपलं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य नेहमीच वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करतो. केवळ या इंडस्ट्रीमधील शक्तीशाली व्यक्ती त्यांच्या नावाचा गैरवापर करुन नवख्या आणि उद्योन्मुख कलाकारांचा फायदा घेतात असं बोललं जात होतं. मात्र यांत तथ्य नसल्याचे तिने म्हटले होते. कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात. इथंही नाण्याला दोन बाजू असून केवळ एकाच बाजूची चर्चा होते असे एकताने म्हटले होते.’