‘टकाटक’ चित्रपटातील ‘हात जग्गनाथ’ गाणे प्रदर्शित

‘टाईमपास’ फेम प्रथमेश परब लवकरच ‘टकाटक’ चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटातील एक गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. आपला हात जग्गनाथ असे या गाण्याचे बोल असून यात एका नव्या कोऱ्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

‘टकाटक’ या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असून, त्याची जोडी रितिका श्रोत्री या नवोदित अभिनेत्रीसोबत जुळली आहे. आपला हात जगन्नाथ गाण्याला आनंद शिंदेने स्वरसाज दिला असून हे गीत जय अत्रे यांनी लिहिले आहे. संगीतकार वरूण लिखते यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे. हा चित्रपट २८ जूनला प्रदर्शित होणार आहे.