‘या’ मालिकेतील मुख्य अभिनेत्यालाही कोरोनाची बाधा ; मुंबईतील शूटिंग तात्काळ रद्द

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये कोरोनाची प्रकरणं समोर येत आहे. काल महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या या दोघीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.

टेलिव्हिजन अभिनेता पार्थ समथान हा कोरोना पॉझिटिव्ह आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकांच्या शूटिंगला काही अटींसह परवानगी देण्यात आली आहे. बालाजी प्रॉडक्शन कसौटी जिंदगी की 2 मध्ये तुम्ही त्याला पाहू शकता.

शोमध्ये तो अनुरागची भूमिका साकारत आहे. आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार क्लिक निक्सोन स्टुडिओतील शूटिंग थांबविण्यात आले आहे. आणि शो स्टार कास्ट आणि क्रू यांना वेळापत्रकानुसार बीएमसीकडे येण्यास सांगण्यात आले आहे. कोरोनासाठी सर्व सदस्यांची चाचणी घेण्यात येणार आहे.

 

 

You might also like