केतकी चितळेची वादग्रस्त फेसबुक पोस्ट! छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेल्या अग्रीमाची बाजु घेत शिवभक्तांना सुनावलं

छत्रपती शिवाजी महाराजांचा  एकेरी उल्लेख केलेल्या कॉमेडियन अग्रीमा जोशुआचा एक जुना व्हिडीओ कालपासून व्हायरल होत आहे. महाराजांचे नाव एकेरी घेणाऱ्या अग्रीमावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा सर्व स्थरावरून केली जात आहे. या सर्व प्रकरणात आता केतकी चितळे  हिने उडी घेतली आहे. आणि तिने  शिवप्रेमींचा रोष स्वतःवर ओढवून घेतला आहे.

अग्रीमाची बाजू घेत केतकीने फेसबुक पोस्ट लिहिली आहे, ज्यात तिने नुसतं शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा!

सोशल मिडीयावर ‘मराठी’ असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे २० ते २५ वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कस चे रिंग मास्टर असतात.

अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!!

सुधारणा करा बाळांनो, शिका.

 

काय आहे नेमक पूर्ण प्रकरण ?

,स्टँड-अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विनोदामुळे नेटिझन्सने तिच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. अग्रिमा जोशुआने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या असून तिच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी सोशल मीडियात जोर धरु लागली आहे.

मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या स्मारकाबद्दल अग्रिमा जोशुआने विनोदातून टीका केली. ही टीका करताना तिने शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेख केला तसेच त्यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरले. अग्रिमा म्हणाली की, “शिवाजी या पुतळ्याबाबत अधिक माहिती जाणण्यासाठी मी गुगलवर Quora इंटरनेट सोर्सवर गेली तर कोणीतरी निबंध लिहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शिवाजी पुतळ्याचा मास्टरस्ट्रोक आहे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता येईल, दुसऱ्या एकाला वाटलं काहीतरी क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट आहे, तो म्हणाला,

या जीपीएस ट्रेकरसुद्धा असणार आहे शिवाय त्यांच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जी अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर नजर ठेवेल. तर तिसरा व्यक्ती येऊन सांगतो, शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, बस्स मी त्यालाच फॉलो केलं” अशा शब्दात अग्रिमाने विनोद केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ट्विटरवर याबाबत नाराजी पसरली असून महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी या स्टँड-अप कॉमेडियनवर कठोर कारवाई करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु अशा तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहे..

दीपिकाने सांगितलं एक खास सिक्रेट, म्हणाली रणवीर रात्री…

You might also like