बिग बॉस १४ च्या घरात वादग्रस्त राधे माँ ची एन्ट्री !

भारतीय टेलिव्हिजनमध्ये सर्वाधिक वादग्रस्त आणि खूप टीआरपी मिळवणारा रियालिटी शो ‘बिग बॉस १४’ आता लवकर सुरु होणार आहे. सलमान खानच्या या शो संदर्भात प्रेक्षकांमध्ये उत्साह आहे. शोच्या प्रोमो व्हिडीओने लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक वादांमध्ये अडकलेली अध्यात्मिक गुरु राधे मा या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात एन्ट्री करताना दिसत आहे.

बिग बॉसमध्ये कोणाची एन्ट्री होणार या नावांबद्दल सोशल मीडियात नेहमी चर्चा असते. अनेक तर्क आणि अफवा देखील समोर येतात. या व्हिडीओतून सलमान खानने शोच्या मेकर्सना मोठ सरप्राईज दिलंय. व्हिडीओच्या माध्यमातून राधे मा घरात एन्ट्री करताना दिसतेय. लाल रंगाच्या साडीमध्ये सजून धजून आणि हातामध्ये त्रिशूल घेऊन ती दिसत आहे.

You might also like